Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादपंकजा मुंडेंची भाजपच्या विभागीय बैठकीला दांडी

पंकजा मुंडेंची भाजपच्या विभागीय बैठकीला दांडी

Pankaja Mundeऔरंगाबाद : औरंगाबादमध्ये भाजपच्या विभागनिहाय आढावा बैठका सुरू आहेत. मात्र, या बैठकीला माजी मंत्री पंकजा मुंडेंनी दांडी मारली. मुंडे सध्या पक्षातील लोकांवर नाराज आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे या बंडाच्या तयारीत आहेत. 12 डिसेंबर रोजी याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती यावर बरेच काही अवलंबून राहिल.

पंकजा मुंडे या आजारी असल्यामुळे येऊ शकत नाहीत, त्यांनी तसं कळवलं आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. परंतु त्यामागे नाराजी नाट्य असल्याचे बोललं जात आहे. यापूर्वी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे १२ डिसेंबरला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. १२ डिसेंबरला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. याच दिवशी गोपीनाथ गडावर मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक जमणार आहेत. या सर्व समर्थकांशी पंकजा मुंडे संवाद साधणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments