Wednesday, May 1, 2024
Homeविदर्भनागपूरएक कोटींच्या खंडणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या शहरात लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण

एक कोटींच्या खंडणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या शहरात लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण

नागपूर : खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. व्यापारी राहुल आग्रेकर (वय ३४ वर्षे) यांचं एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं. आग्रेकर यांच्या दोन मित्रांवर पोलिसांना संशय आहे, जे कालपासून गायब आहेत.

राहुल आग्रेकर काल सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास दारोडकर चौक परिसरातील त्यांच्या घरातून निघाले. एक ते दीड तासात परत येतो, असं त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं. मात्र, ते दुपारपर्यंत परतले नाही. दुपारी राहुल यांच्याच फोनवरून आग्रेकर कुटुंबीयांना राहुलचं अपहरण केलं आहे, त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी द्या, अशी मागणी करणारा फोन आला.

आग्रेकर कुटुंबीय घाबरले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र, संध्याकाळी त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशन गाठून राहुल बेपत्ता असून खंडणीसाठी फोन आल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हापासून पोलिसांच्या अनेक पथकांनी राहुल आग्रेकर यांच्या शोधासाठी खूप प्रयत्न केले. मात्र अद्यापपर्यंत यश आलेलं नाही.

दरम्यान काल रात्रीपासून राहुल यांचा मोबाईल, ज्याच्यावरून अपहरणकर्ते संपर्क साधत होते. तो फोन बंद आहे. त्यामुळे आग्रेकर कुटुंबीयांची काळजी वाढली आहे. राहुल घरातून निघाल्यानंतर घरापासून काही अंतरावर एका बुलेरो जीपमध्ये बसून ते गेल्याचं परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments