Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं : राज ठाकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं : राज ठाकरे

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटवरुन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

राज ठाकरेंनी आपल्या ट्विटवर हॅण्डलवरुन बाबासाहेबांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, “स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल,” असं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments