Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रकौशल्य चाचणी आणि सरळ प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

कौशल्य चाचणी आणि सरळ प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू महाराष्ट्रात घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत 14 क्रीडा प्रबोधिनींची स्थापना करण्यात आली आहे. सन 2019-20 करिता या क्रीडा प्रबोधिनीमध्ये तसेच अन्य 11 महसूल जिल्ह्याच्या ठिकाणी विविध खेळाप्रकारात खेळाडूंना प्रवेश मिळणार असून यासाठी कौशल्य चाचणी आणि सरळ प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे.

राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे अशा खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे. आर्चरी, हॅण्डबॉल, बॉक्सिंग, ऍथलेटिकस , जलतरण, शूटिंग, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, ज्युडो, टेबल टेनिस, वेटलिप्टिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती आणि बॅडमिंटन या खेळ प्रकारात पदक व प्राविण्य प्राप्त अशा खेळाडूंनी सरळ प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे.

आर्चरी खेळ प्रकाराची सरळ प्रवेश प्रक्रिया अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनी येथे 24 आणि 25 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तर हॅण्डबॉल खेळाची सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनी नागपूर येथे 24 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. बॉक्सिंग खेळाची सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे 24 आणि 25 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तर ऍथलेटिकस , जलतरण, शूटिंग, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, ज्युडो, टेबल टेनिस, वेटलिप्टिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती आणि बॅडमिंटन या सर्व खेळाची सरळ प्रवेश प्रक्रिया शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 24 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तर सहभागी खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जातो. तज्ञ समिती सक्षम देऊन प्रवेश दिला जातो. खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रक्रियाही 25 जून पासून राबविण्यात येणार आहे. आर्चरी खेळ प्रकाराची प्रवेश प्रक्रिया अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनी येथे 25 आणि 26 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तर हॅण्डबॉल खेळाची सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनी नागपूर येथे 25 आणि 26  जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. बॉक्सिंग खेळाची सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे 25 आणि 26 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तर ऍथलेटिकस , जलतरण, शूटिंग, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, ज्युडो, टेबल टेनिस, वेटलिप्टिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती आणि बॅडमिंटन या सर्व खेळाची सरळ प्रवेश प्रक्रिया शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 25 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

सरळ प्रवेश प्रक्रिया आणि खेळनिहाय कौशल्य चाचणी मध्ये सहभागी होण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत व कामकाजा दिवशी 20 जून 2019 पर्यंत संपर्क साधून आपले नाव नोंदवणे बंधनकारक असेल तसेच सदर चाचण्याकरिता येणाऱ्या खेळाडूंची कोणतीही निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार नाही. खेळाडूंनी सोबत येताना प्रवेश अर्ज व संबंधित स्पर्धेचे प्राविण्य/सहभाग प्रमाणपत्र चाचणीसाठी उपस्थितीच्या दिनांकापर्यंत सादर करावे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, कांदिवली (पूर्व) येथे नोंदवावे. तसेच काही याबाबत काही माहिती हवी असल्यास 022-22871105 येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments