Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र'गप्पा, गोष्टी, धमाल मस्ती' 'चावडी महाराष्ट्राची' कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर दर सोमवारी, बुधवारी...

‘गप्पा, गोष्टी, धमाल मस्ती’ ‘चावडी महाराष्ट्राची’ कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर दर सोमवारी, बुधवारी व गुरूवारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘गप्पा, गोष्टी, धमाल मस्ती’ ‘चावडी महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर सोमवारी, बुधवारी व गुरूवारी सायंकाळी 7:30 वाजता प्रसारित होणार आहे. बुधवार दि. 10 जुलै 2019 रोजी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे प्रसारण होणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचून महाराष्ट्रातील गावांची, माणसांची व संस्कृतीची ‘चावडी महाराष्ट्राची’ या कार्यक्रमात ओळख करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही निवडक गावात जावून, गावकऱ्यांशी संवाद साधून गावांनी केलेल्या प्रगतीचा आढावा यशोगाथांच्या स्वरूपात घेण्यात आला आहे. तसेच गावांमध्ये झालेल्या गेल्या साडे चार वर्षातील सकारात्मक बदलाची माहिती ‘गप्पा, गोष्टीच्या माध्यमातून या कार्यक्रमात पहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments