Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या ट्विटर अकाऊंटवर भाजपविरोधीच ट्विट

भाजपच्या ट्विटर अकाऊंटवर भाजपविरोधीच ट्विट

BJP Twitter Account, Hackers BJP, Congress Hacks BJP Twitter, Twitterमुंबई: महाराष्ट्र भाजपचे ट्विटर अकाऊंट आज सकाळी हॅक करण्यात आले होते. या अकाऊंटवरून हॅकर्सनी कॉ़ंग्रेसच्या नेत्यांना टॅग करत भाजपवर निशाना साधला होता. भाजप सरकारने घेतलेल्या तीस टक्के कर्मचारी कपात करण्याच्या निर्णयाचा या ट्विटमधून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे भाजप सरकार ३० टक्के कर्मचारी कपात करत आहे. असे लिहून सोबत मेक ईन महाराष्ट्र की फुल ईन महाराष्ट्र असे हॅशटॅग देण्यात आले होते. त्या पोस्ट सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेस, काँग्रेस नेते सचिन पायलट, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना टॅग करण्यात आले आहे.

महाराष्ट्र भाजपचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे भाजप नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ हे ट्विट हटविण्यात आले होते. पण तब्बल तासभर हे ट्विट भाजपच्या ट्विटर अकाऊंटवर होते त्यामुळे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments