मनसेच्या उमेदवारांसाठी ‘बिग बॉस मराठी’ विजेता शिव ठाकरे राजकीय मैदानात उतरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी शिव ठाकरेने माहिम मध्ये नागरिकांना मनसेला मतदान करण्याची विनवी केली.
माहिम मतदारसंघात मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे हे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. रविवारच्या दिवसाचा मुहूर्त साधत संदीप देशपांडेंनी प्रचाराचा धुरळा उडवला. माहिम आणि दादर परिसरात मनसेने जोरदार प्रचार केला.
शिव ठाकरे म्हणाला….
शिव ठाकरे म्हणाला नेहमीच मराठी मानसांसाठी मनसे धावत येते. मराठी माणूसही सर्वप्रथम मनसेकडेच जातो. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांना निवडूण द्या. माझी संदीप देशपांडे यांच्याशी ओळख नसतांनासुध्दा मी काम घेऊन गेलो होतो. तेव्हा माझे काम संदीप देशपांडे यांनी केले होते. मराठी माणसाच्या सोबत राहणा-या मनसेला मतदान करण्याचे आव्हान शिव ठाकरे याने केले आहे.
शिव ठाकरेसोबतच अभिनेत्री स्मिता तांबे आणि नृत्यांगना फुलवा खामकर यांच्यासह मराठी कलाकार मनसेच्या प्रचारासाठी आले होते.