Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत हे आहेत ‘पाच वकील’ कॅबिनेट मंत्री

महाविकास आघाडीत हे आहेत ‘पाच वकील’ कॅबिनेट मंत्री

Lawyer in Maharashtra Cabinet, aaditya thackeray, yashmati thakur, advocate in maha vikas aghadiमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आज (रविवार ५ जानेवारी) ला खातेवाटप जाहीर करण्यात आले. टीम उध्दव ठाकरेमध्ये पाच कॅबिनेटमंत्र्यांचे शिक्षण एलएलबीमध्ये झाले हे विशेष.  त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक विधीतज्ञ मंत्र्यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी २८ नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन अशा सहा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० डिसेंबररोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्र्यांना खातेवाटप कधी होणार याचीच उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अखेर आज रविवारी ५ जानेवारी रोजी महाराष्ट्राला तब्बल 38 दिवसानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ मिळाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दिलीप वळसे पाटील (कामगार, राज्य उत्पादन शुल्क ),  काँग्रेसचे ॲड. के.सी. पाडवी ( आदिवासी विकास) काँग्रेसच्या ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने) (महिला व बालविकास), शिवसेनेचे ॲड. अनिल दत्तात्रय परब ( परिवहन, संसदीय कार्य ), आदित्य उद्धव ठाकरे ( पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार ) या पाच मंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे पाचही कॅबिनेट मंत्री कायद्याचे विद्यार्थी आहेत.

हे आहेत वकिली शिक्षण घेतलेले कॅबिनेट मंत्री….

दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, ( शिक्षण- बीए, एलएलएम )

कामगार, राज्य उत्पादन शुल्क

ॲड. के.सी. पाडवी, ( शिक्षण – एलएलएम )

आदिवासी विकास

ॲड. अनिल दत्तात्रय परब, शिक्षण ( एलएलबी)

परिवहन, संसदीय कार्य

ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने), शिक्षण ( एमए एलएलबी)

महिला व बालविकास

आदित्य उद्धव ठाकरे, शिक्षण ( एलएलबी )

पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments