Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का? – शिवसेना

धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का? – शिवसेना

मुंबई : “कोणी कोणावर आरोप केले म्हणजे कारवाई होत नसते. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची कायद्यानुसार चौकशी होईल. त्यानंतर कादेशीर निर्णय घेतला जाईल. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आहेत. मग काय त्यांना लगेच फासावर चढवायचं का?,” असे भाष्य परिवहनमंत्री अनिल परब यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर केले.

अनिल परब ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना सर्व गोष्टी कायदेशीररित्या होतील असं सांगितलं.“कोणी कोणावर आरोप केले म्हणजे तातडीची कारवाई होत नाही. विरोधकांचं कामच आरोप करणे हे आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले आहेत; त्याची चौकशी होईल. या सर्व गोष्टीसाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याप्रमाणेच सर्व गोष्टी होतील,” असे परब म्हणाले.

तसेच धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यावर मुंडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. या सर्व गोष्टींची खुलासेवार चौकशी होईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय तो निर्णय घेतील, असेही अनिल परब म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर बोलताना सगळ्या गोष्टी कायदेशीर मार्गाने होतील असं सांगितलं. “तक्रार करणे किरीट सोमय्या यांचा धंदा आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून कारवाई करायची हा एकाप्रकारे कुणावर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे कुणी काही म्हणू देत, सत्य बाहेर येऊ देत. त्यांनतरच काय तो निर्णय होईल,” असं अनिल परब म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments