Sunday, May 5, 2024
Homeविदर्भनागपूरधुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’वाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील

धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’वाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील

नागपूर : नागपूरच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयावर हायकोर्टानं आज शिक्का मोर्तब केला आहे. वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या वन्यजीव प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

वन विभागाने न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत वाघिणीला फक्त बेशुद्ध करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. या याचिकेवर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. २ वर्षाच्या या वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काटोल-नरखेड भागात दहशत माजवली आहे.

गावकऱ्यांच्या मनातील भीती बघता तिला मारण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. त्याकरीता वन विभागाने एका प्रशिक्षित व्यक्तीला देखील पाचारण केले होते.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मात्र वाघिणीला ठार मारण्याचा विरोध केला होता, तसेच तिला बेशुद्ध करण्याकरता एका तज्ञाला नागपूरला पाठवले होते. नागपुरातील काही वन्यजीव प्रेमींनी वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने निकाल देताना वन विभागाची बाजू विचारत घेऊन वाघीणीला ठार मारण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments