Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाटी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना : भारत आणि दक्षिण आफ्रिका

टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना : भारत आणि दक्षिण आफ्रिका

बेंगळुरूः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना रविवारी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. या मालिकेमध्ये भारत १-० आघाडीवर असून, रविवारचा सामना जिंकून मालिकाविजय साकारण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर असेल. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका संघाला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी या

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेटनी विजय नोंदवला. त्यामुळे रविवारच्या सामन्यासाठीही भारताचेच पारडे जड मानले जात आहे. विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. त्याच्यासह श्रेयस अय्यरही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मधल्या फळीची मदार प्रामुख्याने या दोघांवर आहे.

यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला सापडत नसलेला फॉर्म ही भारतीय संघाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पंतसाठी आता पर्यायी खेळाडू शोधण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी पंतकरीता कदाचित ही अखेरची संधी असेल. याबरोबरच, शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

गोलंदाजीच्या आघाडीवर भारताकडून तिसऱ्या सामन्यामध्ये नव्या खेळाडूंना संधी देण्यात येऊ शकते. तसे झाल्यास खलील अहमद आणि राहुल चहर यांपैकी एका गोलंदाजाचा अंतिम संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, क्विंटन डीकॉकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघाला दुसऱ्या सामन्यात लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

डीकॉक आणि तेंबा बावुमा यांचा अपवाद वगळता या सामन्यात आफ्रिकेच्या एकाही फलंदाजास वैयक्तिक वीस धावांचा टप्पाही ओलांडता आला नव्हता. डीकॉक हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळत असल्यामुळे चिन्नास्वामीच्या खेळपट्टीचा त्याला चांगला अनुभव आहे. त्यामुळे, रविवारच्या सामन्यामध्येही त्याच्याकडूनच आफ्रिका संघास सर्वाधिक अपेक्षा असतील. त्याचसोबत डेव्हिड मिलर आणि अँडाइल फेलुक्वायो यांसारख्या मधल्या फळीतील फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागणार आहे.

आफ्रिकेची गोलंदाजीची फळी तुलनेने नवी असून कॅगिसो रबाडा हा त्यांच्या संघातील एकमेव अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे, भारतीय संघाला रोखण्यासाठी रबाडाला फॉर्म गवसणे आफ्रिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments