Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeक्रीडान्यूझीलंड विरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी श्रेयस आणि सिराजची निवड

न्यूझीलंड विरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेसाठी श्रेयस आणि सिराजची निवड

मुंबई : मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेण्टी-20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. बीसीसीआयने आज मुंबईतील पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली आहे.

वन डे आणि ट्वेण्टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात ट्वेण्टी-20 मालिका रंगणार आहे. दिल्ली, राजकोट आणि तिरुवनंतपुरममध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत.

तर २२ ऑक्टोबरपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. २५ ऑक्टोबर (पुण) आणि २९ ऑक्टोबर (कानपूर) मध्ये दुसरा आणि तिसरा सामना खेळवला जाईल.

भारतीय संघ : दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, एमएस धोनी, शिखर धवन, केएल राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, मोहम्मद सिराज

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments