मुंबई : सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव मानला जातो. पण सचिन तेंडुलकर हे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र लहान मुलांसाठी अनोखे रूपात सादर होणार आहे.
लहान मुलांसाठी कॉमिक बुकच्या स्वरूपात ‘प्लेईंग इट माय वे’ हे २५ पानांचं खास सेक्शन सचिन तेंडुलाकरच्या आयुष्यातील अनेक प्रेरणादायी प्रसंग वाचकांपर्यंत पोहचवणार आहेत. सचिन तेंडुलकरचे मूळ आत्मचरित्र हे ४८६ पानांचे आहे. त्याला निम्म्या स्वरूपात कॉमिकच्या माध्यमातून येणार आहे. कॉमिक बुकच्या या प्रोजेक्टसाठी सचिन तेंडुलाकरच्या टीमसोबतच Hatchett India काम करणार आहे.