मुंबई/पुणे: पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग समोर आल्यानंतर, शंकांचे ढग दाटलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला.
भारताविरुद्धच्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारताने फिरकीपटू कुलदीप यादवऐवजी अष्टपैलू अक्षर पटेलला संधी दिली आहे.
तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं वानखेडे स्टेडियमवर विजयी सलामी दिली. त्यामुळं मालिकेतलं आव्हान राखायचं तर, टीम इंडियाला आजचा सामना जिंकावाच लागेल. न्यूझीलंडविरुद्धची वन डेची दुसरी लढाई टीम इंडिया इतकीच केदार जाधवसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या भारतीय संघातून त्याला वगळण्यात आलं आहे. आता भारताच्या वन डे संघातलं स्थान राखण्यासाठी केदारला आपली कामगिरी उंचवावी लागेल.
भारत-न्यूझीलंड संघांमधला दुसरा वन डे सामना हा गहुंजेत, म्हणजे केदारच्या घरच्या मैदानात होत आहे, ही त्याच्या दृष्टीनं जमेची बाजू ठरावी.
भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, यजुवेंद्र चहल