Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाविराट जगातील सर्वोत्तम फलंदाज: जावेद मियाँदाद

विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज: जावेद मियाँदाद

नवी दिल्ली: प्रत्येक सामन्यात धावांचा रतीब घालणारा भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद यानं कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट हा प्रतिभावंत असून, जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असं तो म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटनं कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्यानं १६० धावा कुटल्या. मालिकेत सलग तीन विजय मिळवून भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. विराटच्या नेतृत्वाचं आणि फलंदाजीचं कौतुक सगळेच आजी-माजी खेळाडू करू लागले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार मियाँदादनंही एका पाकिस्तानी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत विराटच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. ‘कोहलीची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि कठीण परिस्थितीतही भारताला विजय मिळवून देण्याची त्याच्यात असलेली क्षमता बघता, तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे,’ असं तो म्हणाला.
कोहलीनं ३५७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत १६२१३ धावा केल्या आहेत. कोहलीच्या फलंदाजीबाबत म्हणाल तर, तो सातत्याने धावा करत आहे. एखाद्याच्या फलंदाजीचं तंत्र चुकीचं असेल तर कधीतरीच त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा निघतात. फलंदाजीत सातत्य राखता येत नाही. पण कोहलीची फलंदाजी तंत्रशुद्ध आहे, त्यामुळंच तो सातत्यानं धावा करत आहे. मैदानात असल्यावर तो लगेच गोलंदाजांची जमेची आणि कमकुवत बाजू ओळखतो. त्यामुळेच तो महान फलंदाज आहे, असेही मियाँदाद म्हणाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments