नवी दिल्ली : बुमराह स्ट्राईकवर होता आणि त्याने कूल्थरचा बॉल मिड-ऑफकडे खेळला. दुसरीकडून रन घेण्यासाठी कुलदीप यादवने बुमराहला आवाज दिला. दोघेही रनसाठी धावले. यावेळी कूल्टर नाइलची नजर दुसरीकडे होती. त्याच्या लक्षात आले नाही की, बुमराह धावत येतोय. त्यामुळे बुमराह अचानक मधे आलेल्या कूल्टरला जाऊन भिडला. तरीही त्याने रन पूर्ण केला. जर तो थांबला असता तर कदाचित आऊटही झाला असता. घडलेल्या प्रकाराने बुमराह चांगलाच नाराज होता. त्याने हातवारे करत आपला राग दाखवला. दोघांमध्ये भांडण होणार अशी स्थिती झाली होती.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुस-या टी-२० सामन्यात मात दिली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ८ विकेटने पराभव केला. आता तीन सामन्यांच्या टी-२० सीरिजमध्ये दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा बॉलर नाथन कूल्टर यांच्यात वाद होता होता राहिला. दोघांमध्ये भांडण होणार अशी स्थिती झाली. पण इतक्यात अंपायरने येऊन दोघांना वेगळं केलं.