Saturday, May 4, 2024
Homeदेशकोलकत्यात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याल काळ फासल!

कोलकत्यात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याल काळ फासल!

Dr shyamprasad Mukharjeeकोलकाता:  मार्क्सवाद्यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी त्रिपुरातील बेलोनिया शहरातील जागतिक कीर्तीचे महान कम्युनिस्ट नेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जेसीबी मशीनच्या साह्याने पाडून टाकल्याची घटना ताजी असतानाच, आता कोलकात्यामध्ये भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. 

डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी दगडफेक केल्याचा आरोप केला जात आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यावर दगडफेकही झाली. पुतळ्याला काळे देखील फासण्यात आले. यात पुतळ्याचे नुकसान झाले आहे. शिवाय, या घटनेमुळे कोलकात्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाने या घटनेचा निषेध केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments