भारतीय हवाई दलाची (IAF) दोन लढाऊ विमाने सुखोई-३० (Sukhoi-30) आणि मिराज २००० (Mirage 2000) शनिवारी मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळली. दुर्घटनेवेळी विमान सुखोई-३० मध्ये दोन पायलट होते तर मिराज २००० मध्ये एक पायलट होता. प्राथमिक अहवालानुसार दोन पायलट सुरक्षित आहेत, तर तिसर्या पायलटला प्राणास मुकावे लागले आहे, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
भारतीय हवाई दल चौकशी न्यायालय हे स्थापित करेल की हा अपघात हवेतील टक्करमुळे झाला आहे की नाही. “दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते जेथे सराव सुरू होता,” संरक्षण सूत्रांनी सांगितले.
अपघातात सामील असलेली दोन विमाने नियमित ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग मिशनवर होती, तसेच दोन विमानांच्या अपघाताचे कारण शोधण्याचे आदेश दिले गेले आहेत, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
सूत्रांनी पुढे सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान आणि आयएएफचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या संपर्कात आहेत.
Web Title : Two Indian Air Force fighter jets crash over Morena in Madhya Pradesh; One pilot died