Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशनीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल - रामदेव बाबा

नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल – रामदेव बाबा

नागपूर – मी फक्त एकाच मोदीला ओळखतो, ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त जे पण मोदी आहेत जे, घोटाळे करतात त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब होते. नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल. मोदी सरकार त्याला त्याच्या योग्य जागी धाडेल, असा विश्वास योग गुरु रामदेव बाबांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी सरकारने देशातील लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे. मात्र, नीरव मोदीसारख्या घोटाळेबाज लोकांमुळे हा विश्वास डगमगला जातो. नरेंद्र मोदी सरकार नीरव मोदीकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करेल, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments