Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशअर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न सुरू; नरेंद्र मोदींचा दावा

अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न सुरू; नरेंद्र मोदींचा दावा

Prime minister of india narendra modi

नवी दिल्ली : देशात नागरिकत्व कायद्याविरोधात गदारोळ सुरु आहे. या  मात्र या बाबत पंतप्रधानांनी काही न बोलता देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे लक्ष्य असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे. अॅशोचॅमच्या परिषदेत मोदी बोलत होते. नव तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्यावर आरोप केले, लोकांनी राग काढला तरी देशहिताचे निर्णय घेतच राहीन. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहिम सुरु आहे आणि ते इतकं सोपं नाही. खूप काही सहन कराव लागेल आणि देशासाठी करावं लागतं असंही मोदी म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था 5 ते 6 वर्षांपूर्वी दिशाहीन होती. आमच्या सरकारने यात फक्त स्थैर्य आणण्याचा प्रयत्न केला नाही तर व्यवस्थेत शिस्त निर्माण केली. अनेक दशकांपासून असलेली उद्योगांची मागणी पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं असं मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ASSOCHAM च्या वार्षिक परिषदेत बोलताना भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल मत मांडले. ते म्हणाले की, आम्ही अर्थव्यवस्थेची विभागवार घडी बसवण्याचा प्रयत्न केला. नव तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अथक परिश्रम, दिवस आणि रात्र काम केल्यानंतर व्यवसायात एक उंची गाठता. तुमच्या पॉलिसीत बदल करायचा असतो तेव्हा अगदी ग्राउंड लेव्हलपासून सुरूवात करावी लागते. पारदर्शकता आणण्यासाठी करव्यवस्थेबाबत काही पावलं उचलली जात आहेत असंही मोदींनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments