Monday, August 17, 2026
Homeदेशजामिया : मोदी ‘त्याला’ त्याच्या कपड्यांवरून ओळखा, ओवेसींचा टोला!

जामिया : मोदी ‘त्याला’ त्याच्या कपड्यांवरून ओळखा, ओवेसींचा टोला!

 

Asaduddin Owaisi

दिल्ली : दिल्लीतील जामियानगर येथे सुधारित नागरिकत्व कायद्या ( CAA ) विरोधात सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान गोपाल नावाच्या तरुणाने गोळीबार केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी त्याला त्याच्या कपड्यावरून ओळखा असं ओवेसींनी म्हटलं आहे.


याचबरोबर ओवेसींनी केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर देखील टिप्पणी केली आहे. ”अनुराग ठाकूर आणि सर्व राष्ट्रवाद्यांना धन्यवाद, ज्यांनी एवढा या देशात द्वेष निर्माण केला की, एका दहशतवाद्याने पोलिसांसमोर विद्यार्थ्यावर गोळीबार केला. पंतप्रधान मोदी त्याला त्याच्या कपड्यावरून ओळखा.” असं ओवेसींनी ट्विट केलं आहे. या अगोदर ओवेसी यांनी भाजपा नेते अनुराग ठाकूर यांच्या दिल्ली येथील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना “मी अनुराग ठाकूर यांना आव्हान देतो की, त्यांनी मला भारतातील त्या जागेचं नाव सांगावं जिथे मला गोळ्या घालणार आहेत. मी तिथे येण्यास तयार आहे”. असं म्हटलं होतं.

 

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments