Saturday, May 18, 2024
Homeदेशतिहेरी तलाकविरोधातील शिक्षेला राष्ट्रवादी पक्षाचा विरोध- माजीद मेमन

तिहेरी तलाकविरोधातील शिक्षेला राष्ट्रवादी पक्षाचा विरोध- माजीद मेमन

नवी दिल्ली – तिहेरी तलाकविरोधात कायदा लोकसभेत मंजूर झाला आहे. या कायद्यानुसार तलाक पद्धतीला गुन्हेगारीचे स्वरूप देण्यास विरोध असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. नव्या कायद्यानुसार पतीला ३ वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद चुकीची असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजीद मेमन यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते माजीद मेमन म्हणाले, की इस्लाममध्ये तिहेरी तलाक हा नागरी करार आहे. त्यामुळे पत्नीला चुकीच्या पद्धतीने तलाक देणाऱ्या पतीला ३ वर्षांची शिक्षा देणे चुकीचे आहे. दरम्यान तिहेरी तलाक हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत पाठविले जाणार आहे. मात्र या मंजुरीच्या दिव्यातून विधेयक जाण्यापूर्वीच प्रादेशिक पक्षांनी  विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments