Friday, December 6, 2024
Homeदेशअरविंद सावंत संतापले;महिलांना धमकावने ही शिवसेनेची संस्कृती नाही,राणांचे आरोप खोटे

अरविंद सावंत संतापले;महिलांना धमकावने ही शिवसेनेची संस्कृती नाही,राणांचे आरोप खोटे

अरविंद सावंत म्हणाले मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावलं नाही

mp-navneet-rana-warned-to-shiv-sena-mp-arvind-sawant-new-delhi-issue
mp-navneet-rana-warned-to-shiv-sena-mp-arvind-sawant-new-delhi-issue
नवी दिल्ली: परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख वाद सुरु असतानाच  खासदार नवनीत राणा विरुध्द शिवसेना खासदार अरविंद सावंत वाद सुरु झाला आहे. खासदार नवनीत राणा यांनी अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सावंत यांनी खुलासा करत आरोप फेटाळून लावला. खासदार अरविंद सावंत म्हणाले,”हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावलं हे साफ खोटं आहे. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात.
तुम्ही जर बघितलं, तर जेव्हा केव्हा त्या सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल, त्या खूप द्वेष करतात. तिरस्कार करतात. मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावलं नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का?,” असं सावंत यांनी स्पष्ट केलं.
मात्र, आता नवनीत राणा आक्रमक झाल्या असून, सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. या आरोपांवर खासदार सावंत यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, आता नवनीत राणा यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण अरविंद सावंत यांच्याविरुद्ध तक्रार देणार असं नवनीत राणा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

नवनीत राणांची काय आहे तक्रार?

खासदार राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केलेली आहे. “महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, तसेच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. ‘तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू’, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे,” असं राणा यांनी म्हटलेलं होतं.

वाचा: रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट ; राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments