Tuesday, April 30, 2024
Homeदेशजेवणापेक्षा ‘दलितांच्या’ मुलींशी विवाह करा'

जेवणापेक्षा ‘दलितांच्या’ मुलींशी विवाह करा’

भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्राम स्वराज अभियानाचा भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील दलित व्यक्तींच्या घरी जेवायला जाण्याचा सपाटा लावला आहे. मुळात मोदींनी दलित समाजाच्या मनात भाजपाविषयी निर्माण झालेली अढी दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला होता. मात्र, भाजपातील काही नेत्यांच्या प्रसिद्धीलोलूप स्वभावामुळे हा उपक्रम टीकेच्या भोवऱ्यात सापडला होता.

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या राजकीय नेत्यांमध्ये दलितांच्या घरी जेवायला जाण्याची नवीन प्रथा सुरू झालेय. परंतु, मी या परंपरेचा विरोध करतो. एक दिवस दलितांच्या घरी जेवायला जाऊन परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही. याउलट त्यांचा जातीय उद्धार करायचा असेल तर दलितांशी रोटी-बेटीचे संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. त्यासाठी दलितांच्या मुलींशी विवाह करा, असे मोरारी बापू यांनी सांगितले.

यापूर्वी भाजपाचे खासदार उदित राज यांनीही स्वपक्षाला घरचा आहेर दिला होता. भाजपाचे नेते दलितांच्या घरी जेवायला गेल्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. भाजपाच्या नेत्यांनी दलितांच्या घरी जेवायला किंवा राहायला जाण्याबद्दल माझा आक्षेप नाही. परंतु हे समस्येचे उत्तर आहे का? भाजपाच्या नेत्यांनी आपल्या घरी जेवायला यावे म्हणून दलित समाज भारत बंदमध्ये सहभागी झाला होता का? ते स्वत:च्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि आरक्षणासाठी आंदोलन करत होते. अशा परिस्थितीत भाजपा नेत्यांनी त्यांच्या घरी जेवायला जाण्याची कृती म्हणजे एखाद्या डॉक्टरने पोटाचा आजार असलेल्या रुग्णाला तापाचे औषध देण्यासारखे आहे, अशी टिप्पणी उदित राज यांनी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments