Saturday, May 11, 2024
Homeदेशजयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

शिमला – हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जयराम ठाकूर यांनी पाच वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सट्टी, मुख्यमंत्री पदाचे पराभूत उमेदवार प्रेम कुमार धुमल, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. ठाकूर यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत मुख्यमंत्री पदावर आपली वर्णी निश्चित केली आहे. भाजपने हिमाचल विधानसभा निवडणुकीत ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळविला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments