Saturday, May 4, 2024
Homeदेशगुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा ८ रुपयाने स्वस्त पेट्रोल

गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा ८ रुपयाने स्वस्त पेट्रोल

दिवसेंदिवस पेट्रोल, डिझलचे भाव वाढतच चालले आहेत. सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. नवापूर- महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल ८ रुपये ४७ पैसे स्वस्त आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर नऊ रुपये अतिरिक्त कर आकारला जातो. त्यात तीन रुपये दुष्काळ कर, तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन भरून काढण्यासाठी लावलेला कर, एक रुपया शिक्षण, एक रुपया स्वच्छ भारत अभियान व एक रुपया कृषी कल्याण कराचा समावेश असतो. गुजरातमध्ये हे कर आकारले जात नाहीत, म्हणून तेथे पेट्रोल स्वस्त आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर बुधवारी गुजरातच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८ रुपये ४७ पैसे, तर डिझेलच्या दरात १ रुपया ६१ पैसे तफावत होती. म्हणूनच गुजरातच्या सीमावर्ती भागात वास्तव्य असलेल्या महाराष्ट्रातील वाहनचालकांनी तापी जिल्ह्यात उच्छल शहराच्या पेट्रोलपंपावर गर्दी केली. नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील पेट्रोलची किरकोळ विक्री करणारे व्यावसायिक प्लास्टिकचे ड्रम, कॅनने गुजरात राज्यातून पेट्रोल आणून महाराष्ट्रात विक्री करत आहेत. परंतु, पेट्रोल हे ज्वलनशील असल्याने वेळप्रसंगी ४५ अंश तापमानात ते पेट घेण्याचा धोका आहे. असे असले तरी बुधवारी पेट्रोलची शेजारील राज्यातून खुलेआम वाहतूक सुरू होती.

२ राज्यांतील तफावत
गुजरातमध्ये पेट्रोल ७७.१३ रुपये, तर महाराष्ट्रात ८५.६० रुपये लिटरने विक्री होते. गुजरातमधून पेट्रोल आणले तर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा ८.४७ रुपयांचा फायदा होतो. गुजरातमध्ये डिझेल ७३.८७ रुपये लिटर मिळते. ते ७२.२६ रुपये लिटर मिळते. महाराष्ट्रात १.६१ रुपये डिझेल स्वस्त आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील पानटपरी, किराणा व्यावसायिक गुजरातेतून पेट्रोल ७७.१३ रुपये लिटरने आणतात. महाराष्ट्रात ते ९० किंवा १०० रुपये दराने किरकोळ विक्री करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments