Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशदिल्ली विधानसभा : बिगूल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान; ११ ला मतमोजणी

दिल्ली विधानसभा : बिगूल वाजले; ८ फेब्रुवारीला मतदान; ११ ला मतमोजणी

Sunil Arora Delhi Assembly,Sunil, Arora, Delhi, Assemblyनवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. ८ फेब्रुवारीरोजी मतदान होत असून ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आजपासून दिल्लीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सोमवारी (६ जानेवारी) ला पत्रकार परिषदेत दिली.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाल २२ फेब्रवारी २०२० रोजी संपणार आहे. दिल्लीमध्ये सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. आज सोमवारी निवडणुक आयुक्तांनी तारखा घोषित केल्या.  ७० जागांसाठी ८ फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे तर ११ फेब्रुवारीरोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी १४ जानेवारी रोजी नोटिफिकेशन जारी केलं जाईल.

दिल्लीमध्ये १ कोटी ४६ लाख ९२ हजार १३६ मतदार आहेत. यासाठी ९० हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. २ हजार ६८९ जागांवर १३ हजार ७५० मतदान केंद्र (बुथ) उभारण्यात येईल. विद्यमान केजरीवाल सरकारला मागच्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळविला होता. त्यावेळी भाजप आणि काँग्रेसचा सफाया झाला होता. आता सर्वच पक्षांनी दिल्ली जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments