Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeदेशसूरतमध्ये १०० महिलांना विवस्त्र करुन घेतली मेडिकल टेस्ट

सूरतमध्ये १०० महिलांना विवस्त्र करुन घेतली मेडिकल टेस्ट

सूरत महानगरपालिकेच्या रूग्णालयातील प्रकार

Surat Medical Hospitalअहमदाबाद : गुजरातच्या भूजमध्ये ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी अंतर्वस्त्रे काढायला लावल्याची घटना ताजी असताना एक  धक्कादायक प्रकार समोर आला. सूरत महानगरपालिकेच्या (एसएमसी) रुग्णालयात १०० महिलांना विवस्त्र करून मेडिकल टेस्ट घेण्यात आली आहे. अविवाहित महिलांना काही आपत्तीजनक खासगी प्रश्नही विचारण्यात आलेत. अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे तक्रारीत…

गुजरातमधील सूरत महानगरपालिकेच्या (एसएमसी) एका रूग्णालाचं आहे. एसएमसी कर्मचारी संघटनेनं महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यासमोर या घटनेची तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत कर्मचारी संघटनेने म्हटलेय की, जवळपास १०० महिला प्रशिक्षणार्थी कर्मचारी अनिवार्य फिटनेस टेस्टसाठी सूरत येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेत पोहचल्यानंतर हैराण झाल्या. कारण, तिथं त्या महिला प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना  १०-१० च्या गटानं विवस्त्र उभं करण्यात आलं. यावेळी परिक्षकांनी त्यांच्या खासगीपणावरही असंवेदनशीलता दाखवण्यात आली.

तुम्ही कधी गर्भवती झाला होतात का?

एका आधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्या खोलीत महिलांना विवस्त्र करून उभं करण्यात आलं होतं. त्या खोलीचा दरवाजाही व्यावस्थित बंद केला नव्हता. खोलीमध्ये फक्त एक पडदा लावण्यात आला होता. फिटनेस टेस्टदरम्यान महिलांसोबत गैरवर्तनही केलं गेलं. तसेच त्यांना काही अतिखासगी आणि आपत्तीजनक प्रश्न विचारण्यात आले. यातील अविवाहित महिलांना तुम्ही कधी गर्भवती झाला होतात का? यासारखे प्रश्न विचारण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेतील स्त्री रोग विभागाचे प्रमुख अश्विन वछानी म्हणाले की, ‘रूग्णालयाच्या नियमांनुसार महिलांची शारीरिक चाचणी अनिवार्य आहे. अशी चाचणी पुरूषांची होते का नाही याबाबत माहित नाही. परंतु, महिलांच्या बाबतीत नियमांनुसार अशी चाचणी क्रमप्राप्त आहे. कारण महिलांना एखादा रोग आहे का नाही हे पडताळून पाहणं गरजेचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments