Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशबापरे : इटलीत ११ फुटबॉलपटूंना करोनाची लागण!

बापरे : इटलीत ११ फुटबॉलपटूंना करोनाची लागण!

Italy Football team players coronavirus, coronavirus, ronaldo, messy,नवी दिल्ली : करोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. वेगाने पसरत आहे. काही खेळाडूंना देखील करोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त होते. चीन पाठोपाठ इटलीत करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. इटलीतील फुटबॉल लीग सेरी-एच्या ११ खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे एकच खळबळ उडाली आहे. या सर्व खेळाडूंची करोना चाचणी झाली होती आणि त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

इटलीतील लीग स्पर्धेत २० संघ खेळतात. या स्पर्धेतील ११ खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. इटलीच्या आरोग्य विभागाने नवे आदेश काढले असून सर्व खेळडूंना सराव करण्यापासून बंदी करण्यात आली आहे तसेच घरी राहण्याचे आदेश दिले आहेत.

सीरी-एच्या डॉक्टरांनी स्पर्धेतील सर्व सराव सत्र रद्द करण्यास सांगितले आहे. अन्य खेळाडूंना करोना होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. लीगमध्ये खेळणाऱ्या युसी सांपडोरिया क्लबच्या सात खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर फिओरेंटीनाच्या चार खेळाडूंना करोना झाल्याचे चाचणीतून उघड झाले.

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेसी यांनी देखील सर्व स्पर्धा आणि सराव सत्रातून माघार घेत घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसात जगभरातील ६ खेळांच्या १४ स्पर्धा रद्द केल्या आहेत. तर स्वित्झर्लंडमध्ये १९ ते २४ एप्रिल दरम्यान होणारी वर्ल्ड स्पोटर्स अॅण्ड बिझनेस समिटी रद्द करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments