Sunday, May 5, 2024
Homeदेशवसिम रिझवी हे जोकर, त्यांनी त्यांचा आत्मा संघाला विकला- ओवेसी

वसिम रिझवी हे जोकर, त्यांनी त्यांचा आत्मा संघाला विकला- ओवेसी

नवी दिल्लीवसिम रिझवी हे सर्वात मोठे जोकर आहेत. त्यांनी त्यांचा आत्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विकला आहे. सुन्नी आणि शिया मदरशांबाबत आणि तिथे मिळणाऱ्या शिकवणुकीबाबत त्यांनी केलेले वक्तव्य पाहून हेच म्हणावेसे वाटते अशी टीका एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या विधानावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मदरशांमधून शिक्षण घेतलेली मुले डॉक्टर, इंजिनिअर किंवा सनदी अधिकारी झाल्याचे ऐकले आहे? मात्र ही गोष्ट खरी आहे की मदरशांमध्ये शिकलेली मुले दहशतवादी होतात असे वक्तव्य शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला आणि रिझवी हे सर्वात मोठे जोकर असल्याची टीका केली.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वसिम रिझवी यांनी राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली होती. शिया वक्फ बोर्डाला हा प्रश्न सोडवण्यात स्वारस्य आहे मात्र त्या मौलवींवर विश्वास नाही ज्यांना फक्त दंगलीची आणि जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा कळते. अशी टीका रिझवी यांनी त्यावेळीही केली होती. श्री श्री रविशंकर यांनी राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचवेळी रिझवी यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मदरशांमध्ये देण्यात आलेल्या शिक्षणावर टीका केली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली. मात्र रिझवी यांच्या टीकेवर ओवेसी यांनी ताशेरे झाडले आहेत. मदरशांमध्ये दहशतवाद्यांची निर्मिती होते असे म्हणणाऱ्या रिझवी यांनी त्यांचा आत्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विकला आहे. मी त्यांना थेट आव्हान देतो की त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. तसेच त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना ते सादर करावेत असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments