Saturday, May 18, 2024
Homeदेशअफझल गुरूच्या मुलाला बारावीत ८८ टक्के

अफझल गुरूच्या मुलाला बारावीत ८८ टक्के

महत्वाचे…
१.२०१६मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत गालिबला ९५ टक्के गुण २. गालिब जम्मू-काश्मीर बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत झळकला ३. सोशल मीडियातून जोरदार कौतुक सुरू


श्रीनगर: संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफझल गुरूचा मुलगा गालिब जम्मू-काश्मीर बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत झळकला आहे. बारावीचे निकाल आज जाहीर झाले असून त्यात गालिबला ८८ टक्के गुण मिळाले आहेत.

गालिबला बोर्डाच्या परीक्षेत ५०० पैकी ४४१ गुण मिळाले. यापूर्वी दहावीच्या परीक्षेतही गालिबने चांगले यश मिळवले होते. २०१६मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत गालिबला ९५ टक्के गुण मिळाले होते. ५०० पैकी ४७४ गुण मिळवून त्याने बोर्डात दुसरा क्रमांक पटकावला होता. यशाचे हे सातत्य गालिबने बारावीतही कायम राखले.

दरम्यान, गालिबच्या या यशाचे सोशल मीडियातून जोरदार कौतुक सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे तो राहत असून तेथेही मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्या साराह हयात यांनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या यशाबद्दल गालिबची स्तुती केली असून भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments