Saturday, September 14, 2024
Homeदेशबाप रे…! भाजपाकडे ८९३ कोटींची संपत्ती !!

बाप रे…! भाजपाकडे ८९३ कोटींची संपत्ती !!

नवी दिल्ली:  देशातील राष्ट्रीय पक्षाच्या संपत्तीत मागील १० वर्षांत तब्बल पाचपट वाढ झाली आहे. राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणाऱ्या इलेक्शन वॉच या संस्थेच्या ताज्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. भाजपच्या संपत्तीत या कालावधीत ६२५ टक्के इतकी वाढ झाली आहे.

निवडणूक खर्चात नियंत्रण आणावे यावर चर्चा सुरू असतानाच हे वृत्त आले आहे. मागील १० वर्षांत सात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत ५३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००४-०५ मध्ये या पक्षांची सरासरी संपत्ती ६१.६२ कोटी इतकी होती. जी २०१५-१६ मध्ये ३८८.४५ कोटी रूपये झाली. सर्वांत जास्त वाढ ही भाजपमध्ये दिसून आली. २००४-०५ मध्ये भाजपकडे १२२.९३ कोटी रूपये होते. जी २०१५-१६ मध्ये ८९३.८८ कोटी झाली. म्हणजे यामध्ये ६२७.१५ टक्के वाढ झाली. यादरम्यान काँग्रेसची संपत्तीही १६७.३५ कोटींवरून ७५८.७९ कोटी झाली आहे. म्हणजे काँग्रेसच्या संपत्तीत सुमारे ३५३ टक्के वाढ झाली आहे. या सर्व राजकीय पक्षांच्या संपत्तीचा हिशेब ठेवण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे, असे इलेक्शन वॉचने म्हटले आहे.

दर तीन वर्षांनी राजकीय पक्षांचे ऑडिटर बदलले पाहिजेत, अशी शिफारस इलेक्शन वॉचने केली आहे. एक ऑडिटर दीर्घ काळ एकाच पक्षाशी जुळणे योग्य नाही. कॅगकडून नेमण्यात आलेल्या हिशेब तपासनीकांनीच ऑडिटिंग केले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक राजकीय पक्षाचे दरवर्षी ऑडिटिंग झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही खबर’ व ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments