Tuesday, April 30, 2024
Homeआरोग्यपोटाची चरबी कमी करण्यासाठी हा घ्या नाश्ता?

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा घ्या नाश्ता?

पोट कमी करण्यासाठी आपण नेहमी काहीना काही प्रयत्न करत असतो. व्यायाम करतो, जेवण कमी करतो. आता हीच चरबी कमी करण्याकरता एक सोपा उपाय आहे. दररोज सकाळचा नाश्ता काळजीपूर्वक करा आणि फिट राहा.

सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे आहे. यामुळे आपलं वजन वाढत नाही. चरबी कमी करण्यासाठी उत्तम नाश्ता करणं गरजेचं असतं.

नाश्त्यासाठी काय महत्त्वाचं?

केळी : सकाळच्या नाश्त्यात ऊर्जेसाठी केळी खावी. केळी खाल्याने वजन वाढत नाही आणि एनर्जी वाढते.

पोहे : सकाळच्या वेळी  पोहे चांगले असतात. यामध्ये कॅलरीज कमी असतात. शिवाय पोटही भरते.

अंड :  अंड सगळ्यात उत्तम नाश्ता आहे. अंड्यामुळे ऊर्जा मिळते. तुम्ही उकडलेलं अंड किंवा आमलेट खाऊ शकता.

सोया : न्याहारीमध्ये सोयाची जोड द्या. त्यात कॅलरीज कमी आणि प्रोटिन्स जास्त असतात. शरीरावर चरबी जमा होत नाही.

फळं : रोज नाश्त्यामध्ये फळं असायला पाहिजेत. शक्यतो सिझनप्रमाणे फळ असावं

दूध : दूध सगळ्यांनाच पचत नाही. पण ज्यांना पचतं त्यांनी ते प्यावं. त्यामुळे दिवसभराची एनर्जी शाबूत राहते.

ग्रीन टी : ग्रीन टी घेतल्यानं पचनक्रिया चांगली राहते.

सँडविच: काकडी,टोमॅटो,कांदा,बिट याचं सँडविच बनवून खा

ओट: आहारात ओट असणं कधीही चांगलं. त्यात फायबर्स असतात.

हे खाऊ नका

पेस्ट्रीज,डोनट्स आणि केक : त्यानं तुमच्या कॅलरीज वाढतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments