Tuesday, December 3, 2024
Homeआरोग्यकोविड पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था सुसज्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन

कोविड पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था सुसज्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हेदेखील उपस्थित होते.

Maharashtra CM Eknath Shinde Covid 19 Protocols जगभरात पुन्हा सुरु झालेल्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. राज्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत.

चीनमध्ये वाढत असलेल्या कोविड विषाणू बीएफ ७ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर, राज्यातील सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घेण्याचे आणि मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप पंचसूत्रीचे पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हेदेखील उपस्थित होते.

 

राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला. कोविड परिस्थितीबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी सादरीकरण केले.

राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments