Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeदेश‘पंतप्रधान मोदी देशातील जनतेला नपुंसक समजतात’- दीक्षित

‘पंतप्रधान मोदी देशातील जनतेला नपुंसक समजतात’- दीक्षित

नवी दिल्ली दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपूत्र आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेला नपुंसक समजतात, असे म्हणत त्यांनी नवा वाद निर्माण केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दीक्षित म्हणतात की, रस्त्यांवर उतरलं तर समजेल की पंतप्रधानांच्या वक्तव्याची कशी थट्टा उडवली जात आहे. मला नाही वाटत या पंतप्रधानांना कोणी गंभीरपणे घेत असेल. ७० वर्षांत काँग्रेस आणि सरकारचं सोडून द्या, आपल्या लोकांचा प्रामाणिकपणा आणि कष्टाला त्यांनी खोटं ठरवलं आहे. त्यांना मोठा अहंकार असून मीच म्हणजे सर्व काही, असे त्यांना वाटते. उर्वरित १२५ कोटी लोक या देशात नपुंसक आहेत. जर एखादी व्यक्ती कामाची असेल तर ती आहे नरेंद्र मोदी, असेही त्यांनी उपहासात्मकपणे म्हटले.


संदीप दीक्षित यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर समाचार घेतला जात आहे. पण काहींनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. एक युजरने म्हटले की, जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन का चालला आहात. सत्य हे आहे की, पूर्वी नेते जनतेला मुर्ख बनवायचे. सध्याच्या घडीला ते स्वत:ला नपुंसक समजत आहेत. तर एका विजय सिंह नावाच्या युजरने म्हटले की, जनता तर नाही पण काँग्रेसवाले नक्कीच नपुंसक असतील, अशा शब्दांत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

ओवेसींनी काश्मीरमध्ये ५ शहीद मुस्लीम समाजाच्या जवानांचा दाखला देत, आता तरी मुसलमानांवर शंका घेऊ नका, असे म्हटले होते. यावरही दीक्षित यांनी भाष्य केले. देशाच्या विकासात मुस्लिमांचेही योगदान आहे. काही जणांकडून मुस्लीम हे देशविरोधी असल्याचा प्रचार केला जातो. जर तुम्ही सैन्यात असाल तर तुम्ही राष्ट्रवादी असता. ओवेसींना कदाचित हेच म्हणायचे असेल, असेही दीक्षित यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments