skip to content
Sunday, May 19, 2024
Homeदेशकुलभूषण जाधव यांच्यावर आता दहशतवादाचा आरोप

कुलभूषण जाधव यांच्यावर आता दहशतवादाचा आरोप

नवी दिल्ली – हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे कुलभूषण जाधव यांच्यावर पाकने दहतवादाचा आरोप केला आहे. त्यामुळे कुलभूषण यांच्यावर अंडरट्रायल खटला चालवण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैनिकी न्यायालयाने फाशिची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्या या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. मात्र पाकने आता रडीचा डाव खेळत कुलभूषण जाधव यांच्यावर दहशतवादाचा आरोप ठेवला त्यामुळे कुलभूषण यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments