Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशलग्नाला पाच दिवस उरले असताना नवरदेवाचे गुप्तांग कापून नेले

लग्नाला पाच दिवस उरले असताना नवरदेवाचे गुप्तांग कापून नेले

भोपाळ – लग्नाला पाच दिवस उरलेले असताना अज्ञात आरोपींनी एका २५ वर्षीय तरुणावर हल्ला करुन त्याचे गुप्तांग कापून नेले. मध्य प्रदेशच्या मोरीना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. गुरुवारी सकाळी हा तरुण घराबाहेर पडताच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला करुन त्याचे गुप्तांग कापले. आरोपींनी तिथून जाताना ते गुप्तांगही स्वत:सोबत घेऊन गेले. त्यामुळे शस्त्रक्रियेनेही आता काही होऊ शकत नाही.

येत्या ६ फेब्रुवारीला त्याचे लग्न होणार होते. पोलिसांना अद्याप या आरोपींची ओळख पटवता आलेली नाही तसचे या हल्ल्यामागचा उद्देशही कळलेला नाही. आमच्या हाती काहीही धागेदोरे नाहीत. पीडित तरुण काही बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीय असे पोलीस निरीक्षक अमित शर्मा यांनी सांगितले. शस्त्रक्रियेद्वारे तुटलेला अवयव शरीराशी जोडता येतो. त्यासाठी  घटनास्थळी शोध घेऊनही अवयव सापडला नाही असे पोलिसांनी सांगितले.

पीडित तरुण नदी किनारी फेरफटका मारण्यासाठी गेलेला असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला व गुप्तांग कापले असे गावक-यांनी पोलिसांना सांगितले. पीडित तरुणाच्या घरच्यांनीही कोणावर संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे आम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही पीडित तरुणाच्या जबानीची वाट पाहत आहोत असे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments