Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादनितीन आगे खून प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका

नितीन आगे खून प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका

औरंगाबाद – राज्यात गाजलेल्या नितीन आगे खून प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. नितीन आगेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. या खून प्रकरणात साक्षीदार फितूर झाले. अनेक साक्षीदार तपासले गेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची पुनर्रतपासणी सीबीआयमार्फत करावी अशी मागणी मुंबईचे नितीन भालेराव यांनी याचिकेत केली आहे.

२८ एप्रिल २०१४ साली अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालूक्यातील खर्डा गावात प्रेमप्रकरणातून नितीनची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात २६ साक्षीदार होते. त्यापैकी १४ साक्षीदार फितूर झाले. पोलीस यंत्रणेने तपास व्यवस्थित केला नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments