Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशमुंबईतील फेरीवाल्यांची बाजू कपिल सिब्बल मांडणार

मुंबईतील फेरीवाल्यांची बाजू कपिल सिब्बल मांडणार

महत्वाचे…
१. संजय निरुपम मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आव्हान देणार २. फेरीवाला विरुध मनसे अशी लढाई सध्या सुरु ३. फेरीवाला धोरण लटकल्याने फेरीवाल्यांची अडचण


मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांची हायकोर्टात बाजू मांडण्यासाठी आता थेट काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ विधीतज्ञ कपिल सिब्बल येणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी यासंदर्भात माहिती दिली.

फेरीवाल्यांसंदर्भातील १ नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिला होता, त्या निर्णयाला संजय निरुपम आव्हान देणार आहेत आणि त्यासाठी कपिल सिब्बल मुंबईत येऊन हा खटला लढवतील.

कपिल सिब्बल कोण आहेत?

कपिल सिब्बल यांच्या गाठीशी वकील म्हणून दांडगा अनुभव आहे. काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते असलेले कपिल सिब्बल हे यूपीएच्या काळात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होते.

मुंबई हायकोर्टाने १ नोव्हेंबरला काय निर्णय दिला होता?

फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात दाद मागणाऱ्या मुंबई  काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना हायकोर्टाने दणका दिला होता. मुंबईत कुठेही फेरीवाल्यांना धंदा करु देण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली होती. शिवाय, मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारीत फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी हायकोर्टाने दिली.

हायकोर्टाने फेरीवाल्यांना कुठे मनाई केली आहे?

– शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या १०० मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना मनाई
– रेल्वे स्टेशन, पालिका मंडईच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई
– रेल्वे पादचारी पुल, स्कय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments