Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशकाँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर हल्ला

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवर हल्ला

Adhir Ranjan Chowdhury,Adhir, Ranjan, Chowdhuryनवी दिल्ली  : सत्ताधा-यांवर अभ्यासू भाषणातून सडून प्रहार करणारे काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांच्या दिल्लीतील निवावसस्थानावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी अधीर रंजन चौधरी यांनाही मारहाण  केली. संध्याकाळच्या सुमारास आज मंगळवार (३ मार्च) रोजी ही घटना घडली.

संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हल्लेखोर घरात घुसले. त्यांनी घरातील सामनाची मोडतोड केली. अधीर रंजन यांच्या घरातील स्टाफने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोण आहेत अधीर रंजन चौधरी…

अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या बेरहमपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. बंगाली कुटुंबातील असलेल्या अधीर रंजन यांचा जन्म २ एप्रिल १९५६ झाला. १९९६ मध्ये ते राजकारणात आले. त्याच वर्षी ते आमदरा झाले. त्यानंतर १९९९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments