skip to content
Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्याओडिशात ‘अग्नी-२’ची रात्रीची चाचणीत यश

ओडिशात ‘अग्नी-२’ची रात्रीची चाचणीत यश

Agni 2 Missile,Agni 2 बालासोर : अग्नी-२ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओडिशा किनारपट्टीवरून घेतलेली रात्रीची चाचणी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटर असून, ते यापूर्वीच लष्कराच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळी हे क्षेपणास्त्र प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले. २० मीटर लांबी असलेल्या या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करतेवेळी वजन १७ टन होते आणि ते एक हजार किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते. अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही नियमित चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही चाचणी शनिवारी रात्री घेण्यात आली.

ही आहेत ‘अग्नी-२’ची वैशिष्ट्ये…

अग्नी २ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. याची लांबी सुमारे २० मीटर आहे आणि एक हजार किलो पेलोड घेऊन जाण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. दोन टप्प्यात आपलं लक्ष्य गाठणारं हे क्षेपणास्त्र सॉलिड फ्युएलवर चालतं. हे डीआरडीओने तयार केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments