skip to content
Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांनी चांगली भूमिका बजावली : बाळासाहेब थोरात

संजय राऊतांनी चांगली भूमिका बजावली : बाळासाहेब थोरात

Sanjay Raut played a good role: Balasaheb Thorat
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मध्यंतरी चांगली भूमिका बजावली. समतोल राखला व त्यांचा निर्णय सर्व महाराष्ट्रातील जनतेला आवडला. अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांची स्तुती केली.

आज काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कार्यअध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांच्यासह इतर नेत्यांनी राऊत यांची लिलावती रूग्णालयात भेट घेतली. राऊतांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे असं थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

थोरात यांनी यावेळी पत्रकारांनी सत्तेच्या वाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कालच दिल्लीतील नेते आले होते. सर्व काही त्यांनी तुम्हाला सांगितलं. सर्व काही व्यवस्थीत सुरु आहे. पुढील बैठकीत सर्व काही निर्णय घेतले जातील असेही सांगितले.

सोमवारी रात्री राऊत यांच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेते राऊत यांच्या भेटीसाठी जात आहेत. एक दोन दिवसांमध्ये राऊत यांनी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments