skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रहायकमांडच्या निर्णयानंतरच शिवसेनेला पाठिंबा : मल्लिकार्जु खर्गे

हायकमांडच्या निर्णयानंतरच शिवसेनेला पाठिंबा : मल्लिकार्जु खर्गे

mallikarjun kharge on government
मुंबई : शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जु खर्गे बोलताना म्हणाले की, जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे. आमचा देखील तोच निर्णय आहे. मात्र, हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जु खर्गे यांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक झाली. यावेळी आमदरांसोबत काँग्रेस नेत्यांची खलबतं झाली. मात्र, काँग्रेसने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही. खर्गे यांनी शिवसेनेला पाठिंब्याबाबत सर्व निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सध्या बैठक सुरु आहे. पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका जाणून घेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आमदारांसोबत द रिट्रीट हॉटेलमध्ये उध्दव ठाकरे बैठक घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापणाचा पेच कायम आहे. भाजपचीही बैठक वर्षा निवासस्थानी सुरु आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments