skip to content
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रपवारांचे नातू रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंना फोनवरून दिल्या शुभेच्छा

पवारांचे नातू रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंना फोनवरून दिल्या शुभेच्छा

rohit pawar and aadity
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेडमधून निवडून आले. रोहित यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. आदित्य यांनीही रोहित यांना शुभेच्छा दिल्या. या मैत्रीपूर्ण शुभेच्छांमुळे महाराष्ट्राची खरी सभ्य राजकीय संस्कृती जपली जात असल्याचीही भावना व्यक्त केली जात आहे. याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

सत्ताधारी विरोधक नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. विधानसभा निवडणुकीत तर प्रचाराची पातळी खाली गेली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवर्निवाचीत आमदार रोहित पवारांनी यापलीकडे जाऊन राजकारणात मैत्री जपावी हे आदित्य ठाकरेंना फोनकरून शुभेच्छा दिल्या. व सर्व जनतेला दाखवून दिलं.

तसेच आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर देखील विरोधी पक्ष भाजपचे उमेदवार राम शिंदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तसेच निवडणुकीतील वाद थांबवायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावेळी राहित पवार यांनी यापुढे आपण कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचंही नमूद केलं होतं. याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments