Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिवसेनेचा नव्हे भाजपाचाच होणार - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री शिवसेनेचा नव्हे भाजपाचाच होणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री शिेवसेनेचा नव्हे भाजपाचाच होणार आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल असं सांगितलं. “मी भाजपाचा मुख्यमंत्री आणि आणि शिवसेनेचाही. हे युतीचं सरकार आहे,” असंही मुख्यमंत्री फडणवीस बोलले. शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना पुढील मुख्यमंत्री करण्याच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, “आदित्य ठाकरे काय करणार किंवा त्यांना कोणतं पद दिलं जाईल हा शिवसेनेचा निर्णय असेल. जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे सर्वांनाच माहिती आहे असं सांगत फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments