skip to content
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमी स्वत: शुक्रवारी ईडी कार्यालयात जाणार : शरद पवार

मी स्वत: शुक्रवारी ईडी कार्यालयात जाणार : शरद पवार

sharad pawarमुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली, म्हणाले की मी स्वत: 27 सप्टेंबररोजी ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. नेमका गुन्हा काय आहे ते समजून घेणार आहे. पंतप्रधानांचे नाव न घेता दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही असा टोला पवारांनी पत्रकार परिषदेत लगावला.

पुढे पवार म्हणाले की, मी कारखाने, सुतगिरण्यांचा कधी सदस्य नव्हतो. तसेच माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. मी प्रचारासाठी महिनाभर महाराष्ट्राबाहेर असणार आहे. मी येत नाही असे ईडीला वाटू नये म्हणून मी स्वत: 27 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार आहे. पूर्ण सहकार्य करणार आहे.

महाराष्ट्रावर शिवरायांचे संस्कार आहे. माझ्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. म्हणूनच ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीला काय पाहूणाचार करायचा करायचा करू द्या. माझे नाव कधीच नव्हते मग आले कसे असा सवाल पवारांनी ईडीच्या कारवाईवर उपस्थितीत केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments