skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस आघाडीत येण्यासाठी मनसेकडून प्रस्ताव नाही – बाळासाहेब थोरात

काँग्रेस आघाडीत येण्यासाठी मनसेकडून प्रस्ताव नाही – बाळासाहेब थोरात

सत्ताधारी युतीला  सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने समविचारी पक्षांची मोट बांधली आहे. मात्र, मनसेकडून आघाडीत येण्यासाठी व काँग्रेस आघाडीत शामिल करण्या करीता कुणीही प्रस्ताव दिला नाही. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज ठाकरे यांचा पक्ष आघाडीत येण्याची शक्यता नाही, आघाडीत येण्यासंदर्भात राज ठाकरेंकडून यांच्याकडून किंवा आमच्याकडूनही काही प्रस्ताव दिला नाही. किंबहुना, मनसेच्या संदर्भात अजून तशी काही चर्चाच झाली नाही. असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे यांचा पक्ष मनसेला आघाडीत घेण्याची मागणी केली जात आहे. परंतु आघाडीबाबत मनसेकडून कोणताच प्रस्ताव अद्याप आला नाही, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. मात्र मनसे स्वबळावर लढणार की, आघाडीला पाठिंबा देणार या बाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments