Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसैनिकांनो स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा : उध्दव ठाकरे

शिवसैनिकांनो स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा : उध्दव ठाकरे

uddhav thackeray on bjp

मुंबई : विधानसभेत शिवसेना-भाजप युती होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेत युती झाली नाही तर शिवसैनिकांनो 288 जागा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या. यामुळे यंदाही युती फिस्कटण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते,पदाधिकारी इच्छूकही युतीबाबत संभ्रावस्थेत आहेत. दोन्ही पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. त्या पध्दतीने त्यांनी मुलाखतीही उरकलेल्या आहेत. मात्र अधिकृतपणे शिक्कामोर्तब न झाल्यामुळे दोन्ही पक्षांमधील इच्छूक आदेशाची वाट बघत आहे.

उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. मातोश्रीवर झालेल्या मुंबईतील विभागवार बैठकांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. मात्र त्यामध्येही काही निर्णय झाला नाही. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजप शिवसेनेची युती होईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र यंदा गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवा आणि त्यानुसार तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. त्यामुळे युतीचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments