आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने नेहमी चर्चेत राहणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने सोशल मीडियावर पुन्हा एकदा हैराण करणारा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पूनम पांडेने शेअर केलेला हा नवा टॉपलेस फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. फोटोतील तिचा बोल्ड अंदाज दंग करणारा आहे.
२०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पूनम पांडेचे नाव अचानक चर्चेत आले. कारण तेव्हा तिने टीम जिंकल्यानंतर न्यूड होणार असल्याचे वचन दिले होते. मात्र बीसीसीआयने तिला असे करण्यास परवानगी दिली नाही. मात्र २०१६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर पूनमने सेमी न्यूड फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. तिने नशा सिनेमात काम केले आहे.