skip to content
Tuesday, May 21, 2024
Homeदेशतरुण तेजपाल विरोधातील बलात्कार सुनावणीला ९ मेपर्यंत स्थगिती

तरुण तेजपाल विरोधातील बलात्कार सुनावणीला ९ मेपर्यंत स्थगिती

Tarun Tejpalपणजी: पत्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी पत्रकार तरुण तेजपाल याला कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने तरुण तेजपालची याचिका फेटाळली होती. त्यानंतर तेजपाल यानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली असून, मेपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात तेजपालच्या याचिकेवरील सुनावणी १२ डिसेंबर २०१७ ला पूर्ण झाली होती. न्या. नूतन सरदेसाई यांनी निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने तेजपालच्या विरोधात निर्णय दिला होता. आरोपपत्र रद्द करण्याची त्याची मागणी फेटाळण्यात आली.

हे आहे प्रकरण
२०१३ साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात १७ फेब्रुवारी २०१४ साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे ७९ दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात १५० साक्षीदार नोंद करण्यात आलेले. ३० नोव्हेंबर २०१३  रोजी तेजपालला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांत त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments